GP Logo
ग्रामपंचायत भोसे
ता. पाथर्डी · जि. अहिल्यानगर
🔔 ग्रामसभा बैठक दिनांक २०/०५/२०२६ · PMAY-G अर्ज अंतिम तारीख ३१/०५/२०२६ · मालमत्ता कर अंतिम तारीख ३०/०६/२०२६ · पाणीपुरवठा: सोम, बुध, शुक्र सकाळी ७:०० ते ९:००

नागरी सेवा

Citizen Services — Gram Panchayat Bhose

📢 महत्त्वाची सूचना:

सर्व सेवांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:३० दरम्यान येऊन संपर्क करा. अर्जाचे नमुने कार्यालयात मोफत उपलब्ध आहेत.

🍼

जन्म दाखला

Birth Certificate

शुल्क: ₹२० वेळ: २-३ कार्यालयीन दिवस

प्रक्रिया:

  1. 1अर्ज भरा (नमुना-१)
  2. 2रुग्णालय/आशा ताईचे प्रमाणपत्र सोबत आणा
  3. 3आई-वडिलांचे आधार कार्ड
  4. 4ग्रामपंचायतीत जमा करा
  5. 5२-३ दिवसांत दाखला मिळेल

आवश्यक कागदपत्रे:

  • रुग्णालयाचा जन्म प्रमाणपत्र
  • आई-वडिलांचे आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा

ℹ️ जन्मानंतर २१ दिवसांत नोंदणी विनामूल्य. उशिरा नोंदणीसाठी कोर्ट ऑर्डर आवश्यक.

🕊️

मृत्यू दाखला

Death Certificate

शुल्क: ₹२० वेळ: २-३ कार्यालयीन दिवस

प्रक्रिया:

  1. 1मृत्यूच्या ७ दिवसांत अर्ज करा
  2. 2रुग्णालय / डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणा
  3. 3कुटुंबाचे ओळखपत्र सोबत आणा
  4. 4अर्ज ग्रामपंचायतीत जमा करा

आवश्यक कागदपत्रे:

  • मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र
  • कुटुंबाचे आधार/रेशन कार्ड
  • मृताचे ओळखपत्र

ℹ️ मृत्यूनंतर २१ दिवसांत नोंदणी विनामूल्य.

🏡

रहिवासी दाखला

Domicile / Residence Certificate

शुल्क: ₹५० वेळ: ५-७ कार्यालयीन दिवस

प्रक्रिया:

  1. 1विहित अर्ज भरा
  2. 2आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र सोबत आणा
  3. 3जुन्या रहिवाशाचे साक्षीदार आणा (आवश्यक असल्यास)
  4. 4ग्रामपंचायतीकडून पडताळणी

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • वीज बिल/पाणी बिल (रहिवासाचा पुरावा)
  • पासपोर्ट फोटो

ℹ️ किमान ३ वर्षे गावात वास्तव्य आवश्यक.

💰

उत्पन्न दाखला

Income Certificate

शुल्क: ₹५० वेळ: ७ कार्यालयीन दिवस

प्रक्रिया:

  1. 1विहित अर्ज भरा
  2. 2शेतीची ७/१२ उतारा (शेतकऱ्यांसाठी)
  3. 3नोकरी प्रमाणपत्र (नोकरदारांसाठी)
  4. 4ग्रामसेवक पडताळणी

आवश्यक कागदपत्रे:

  • ७/१२ उतारा (शेतकऱ्यांसाठी)
  • नोकरीचे प्रमाणपत्र / वेतन स्लिप
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट फोटो

ℹ️ प्रत्येक वर्षी नूतनीकरण आवश्यक.

🏦

मालमत्ता कर (घरपट्टी)

Property Tax

शुल्क: मालमत्तेनुसार वेळ: तात्काळ

प्रक्रिया:

  1. 1घरपट्टी पुस्तक किंवा मागील पावती घेऊन या
  2. 2ग्रामपंचायत कार्यालयात येऊन रक्कम भरा
  3. 3पावती घ्या
  4. 4ऑनलाईन पर्याय उपलब्ध नाही (लवकरच)

आवश्यक कागदपत्रे:

  • मालमत्तेचे कागद / ७/१२
  • मागील वर्षाची पावती
  • आधार कार्ड

ℹ️ वार्षिक मालमत्ता कर वेळेत भरा. उशिरा भरल्यास दंड आकारला जाईल.

📋

तक्रार नोंदणी

Complaint Registration

शुल्क: विनामूल्य वेळ: १५ दिवस

प्रक्रिया:

  1. 1लेखी तक्रार अर्ज लिहा
  2. 2ग्रामसेवक किंवा सरपंचाकडे द्या
  3. 3पोचपावती घ्या
  4. 4१५ दिवसांत प्रतिसाद मिळेल
  5. 5जिल्हा परिषदेकडे अपील करता येईल

आवश्यक कागदपत्रे:

  • लेखी तक्रार अर्ज
  • पुरावे (फोटो, कागदपत्रे)
  • आधार कार्ड

ℹ️ गंभीर तक्रारींसाठी BDO कार्यालय, पाथर्डी येथेही संपर्क करू शकता.

सेवेसाठी संपर्क

दूरध्वनी
7774006909
कार्यालयीन वेळ
सोम-शनि: सकाळी ९ ते संध्याकाळी ५:३०
पत्ता
ग्रामपंचायत कार्यालय, भोसे